Monday, 13 September 2010

वन्दे मातरम्.... Vande Mataram...

वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे मातरम् ।। ३ ।। वन्दे मातरम् ।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् ।

श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।।

स्वतंत्रतेचे स्तोत्र

स्वतंत्रतेचे स्तोत्र




जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्

स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

महाराष्ट्र गीते.... Maharashtra Geete....

Maharashtra Geet

जय जय महाराष्ट्र माझा
, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा , कृष्ण कोयना , भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला , निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो , महाराष्ट्र माझा.

=======================
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥

विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणी , मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥
===================================================================


मराठी असे आमुची मायबोली , म्हणाया जरी राज्यभाषा असे
घरी आणि दारी कुणी ना विचारी अनाथपरी दीन दु:खी दिसे
गुळाचा कळे स्वाद ना गाढवांना , उकिर्डेच ते नित्य धुंडाळती
तसे हा! मराठीस सारुनि दूरी किती मूढ हे विंग्रजी भुंकती।। 1 ।।

मुलांना , मुलींना शिशुंना जया आंग्लभाषेत शिक्षा दिली
अतिक्लिष्ट भाषा महाशत्रुभाषा जयांनी स्वपाल्यावरी थोपली
तयांनी गणा आत्मजांचीच जिव्हा स्वहस्ते असे कापिली छाटली
तयांनी घराला , यशाला , सुखाला स्वहस्तेच की आग हो लावली।। 2 ।।

' घरामाजी बाहेर बोलेन भाषा मराठीच ' या आग्रहाते धरा
शुभेच्छा , क्षमेच्छा , तशी स्वागतेच्छा मराठीमधे सर्व काही करा
मराठीमधये सांगता येत नाही असे या जगामाजि काही नसे
मराठी फिकी इंग्रजीच्या पुढे या महान्यूगंडास सोडा कसे।। 3 ।।

मराठी असो गुर्जरी कानडी वा तुळू तेलगू तामिळीही असो
असो ओरिया बंगला आणि हिन्दी असामी तशी कोंकणी का असो
असू द्यात वाणी गुरुंच्या मुखींची , असू द्यात मल्याळ सिंधी असो
गणू या स्वदेशी स्वभाषाच आम्ही परंतु कुठे विंग्रजी ती नसो।। 4 ।।

अहो इंग्रजी एक कृत्या म्हणावी तिने सर्व देशास या भक्षिले
तिने एकता भंगिली भारताची तिने भांडणाते असे रोविले
तिने प्रान्त भाषांत बांधून भिंती आम्हाला न एकत्र येऊ दिले
अहो राक्षसीला त्वरें घालवा त्या , तरी रक्षु स्वातंत्र्य संपादिले ।। 5 ।।

अमांगल्यपूर्णा , अभद्रा दरिद्रा , महाबोबडी तोकडी जी असे
अतिक्रूरकर्मी जगी क्रौर्यधर्मी खळा-राक्षसांचीच भाषा असे
जरी प्राण कंठास आले तरीही कधी यावनी भाष बोलू नका
ऋषींचे मुनींचे विचारीजनांचे असे सांगणे तुच्छ मानू नका।। 6 ।।

जगामाजि भाषा अनेका अनेका परिश्रेष्ठ ती मातृभाषा असे
तिचा मान सन्मान वा स्थान घेण्या जगी या कुणी अन्य भाषा नसे
तशातून शास्त्रे-कला-ज्ञानपूर्णा महाशक्तीशाली मराठी असे
शिकाया जगाची कुणी अन्य भाषा गणा मातृभाषाच किल्ली असे।। 7 ।।

निमंत्रावया लग्न मुंजीस आली , अशी छापिली सुंदरा पत्रिका
कळेना अमांगल्यपूर्णा अभद्रा करंट्या अशा आंग्लभाषेत का ?
नवे वर्ष दीपावली पुत्रजन्मी शुभेच्छा कुणाला कुणी धाडती
अशाही प्रसंगी पहा मोठमोठे , स्वभाषा न हा! विंग्रजी योजिती।। 8 ।।

मराठी असे हो जरी मायबोली , न ये ज्ञानदेवी तयां वाचता
न ये नामदेवी तुकाराम गाथा , न ये श्लोक आर्यादि उच्चारता
जरी पत्र आले मराठीत साधे तयालागि ते येईना वाचता
शिरी बैसली विंग्रजीनाम कृत्या तिला येईना हो मुळी फेकता।। 9 ।।

पुरी , पेठ वा मार्ग , यांना कशाला हवे नाम त्या भ्रष्ट भाषेतले ?
घराला , स्वनामांकिता पट्टिकेला , लिहीता स्वभाषेत का वांगले ?
दुकानाप्रती नाम काहो विदेशी ? धनप्राप्तीची पावती विंग्रजी
किती रंग ते , अंक वा स्वाक्षरीही अजूनी पहा विंग्रजी घासती ।। 10 ।।

कुणी सांगती ती असे विश्वभाषा , तिचे ग्रंथभांडार मोठे असे
अहो ज्ञानविज्ञान स्थापत्य वैद्यादि शास्त्रे तिच्यावीण येती कसे ?
तिच्यावीण न्यायालयां मूकता ये तिच्यावीण आदेश देता नये
असे सर्व मिथ्या तया विंग्रजीला म्हणावे ' करी तोंड काळे बये ' ।। 11 ।।

अरण्यामध्ये खावया रामरायवारी जेधवा ताडका धावली
' न किंतू धरी , ठार मारी तिला तू ' गुरुंनी अशी स्पष्ट आज्ञा दिली
तदा राघवाने शराधात केला , जशी दुष्ट ती राक्षसी मारिली
तशी देशव्यापी महाताडका ही , हिला पाहिजे आज संहारिली।। 12 ।।।

शिशु बालकां ठार मारावयाला जिला पाठवी कंस वृंदावनी
किती लाघवी बोलणे चालणे हो विषाला परी चोपडी स्वस्तनी
यशोदासुताने बया पूतनेला , तिच्या दुष्ट हेतूसवे मारिले
तसे इंग्रजीरुप या पूतनेला यमाच्या घरी पाहिजे धाडले।। 13 ।।

कुणी सांगती तीस संपर्क भाषा , महापापसंपर्क ती जोडते
करी भेद निर्माण प्रांतात भाषांत , आम्हामधे फूट ती पाडते
स्वदेशीय भाषांस धिक्कारूनी जे , अहो विंग्रजीला महामानती
कसे स्वाभिमानास टाकून देती किती सन्मती जाहले दुर्मती ।। 14 ।।

मराठी असे आमुची मायबोली , तिला रज्य का ? विश्वभाषा करू
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे तिच्यामाजी आणोन आम्ही भरू
पुन्हा पेटवू स्वाभिमानस आम्ही पुन्हा एकदा शौर्य धैर्या धरू
मराठीस तारू , स्वदेशास तारु सुखी विश्व होईल ऐसे करु ।। 15 ।।

मराठी असे सर्वथा श्रेष्ठ भाषा जिने गाजविल्या दहाही दिशा
तिचे पुत्र आम्ही कसे साहताहो , कशी जाहलीसे तिची दुर्दशा
मनी आठवू भक्त श्रीनामदेवा , गुरुग्रंथसाहेब जो भूषवि
रघुनाथरावास त्या पेशव्याला , मराठीस सिंधूवरी पोचवी।। 16 ।।

अहो आठवा संत ते मानभावी जयांनी दिशा दक्षिणी जिंकली
तसे काबुली कृष्णभक्तांस त्यांनी असे धर्मभाषा मराठी दिली
मराठी असे अमृताचीच थाळी जिला ज्ञानदेवें स्वयं रांधिली
तिची पाहिजे हो ध्वजा उंच केली ,
पुन्हा उच्च स्था‍नी तिला स्थापिली ।। 17

=====================================================================


मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी , निशाणावरी , नाचते करी ;
जोडी इह पर लोकांसी , व्यवहारा परमार्थासी ,
वैभवासि , वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा , कृष्णा , भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
=============================================================================


खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला , भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा , आज दिवाळी
चला , सयांनो , अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे , सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी , जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

===============================================================



लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

-
सुरेश भट