वीर सावरकरांवर वाचलेला अप्रतिम लेख...
स्वातंत्र्यवीर सावरकर - प्रखर देशभक्त, थोरस्वातंत्र्य सेनानी
प्रखर देशभक्त, थोरस्वातंत्र्य सेनानी, फर्डा वक्ता, समाज सुधारक, महाकवी, साहित्यिक, इतिहास संशोधक, द्रष्टा नेता, मराठी भाषा प्रेमी आणि हिंदुहृदय सम्राट तात्याराव सावरकर.....स्वतंत्र हिंदुस्थानातही गुन्हेगार ठरलेले व पुन्हा मृत्युनंतर चार दशकांनी ज्यांच्या राष्ट्रभक्तिचा ज्यांनी राष्ट्रासाठी काहिही केले नाही अशा नेत्यांकडुन अपमान झालेले देशभक्त सावरकर....आजच्या सरकारला त्यांची थोडी पण दखल घेता येऊ नये....आणि तरिही कोट्यावधी भारतीयांच्या ह्रुदयात ज्यांना अढळ स्थान आहे त्यास्वातंत्र्यवीर सावरकरासाठी अश्या तेजस्वी सूर्याची आज पुण्यतिथी
त्या निम्मिताने मी केलेली कल्पना आणि मांडलेला हा लेख सादर करत आहे माझ्या कल्पनेत आपण सर्व शेवटच्या क्षणी मनाने तात्यांजवळ बसलो आहोत कोणी पाया जवळ बसला आहे कुणी डोक्याजवळ आणि तिथूनच सुरु होतो हा लेख
साधारण जून १९६३ रोजी सह्याद्री मासिका मध्ये "आत्महत्या आणि आत्मार्पण " हा तात्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता तेव्हाचमनात कुठे तरी पाल चुकचुकल्या सारखी झाली होती तात्यांना सांगायचं तरी काय होत, १ फेब्रुवारी १९६६ रोजी तात्यांनी घोषणाकरून "प्रायोपवेशनास" सुरवात केली तेव्हा त्या लेखाचा अर्थ डोळ्यासमोर स्पष्ट झाला
त्यादिवशी २६ फेब्रुवारी १९६६ सकाळची वेळ आम्ही तात्यांच्या शेजारी बसलो होतो सर्वांस कळून चुकल होत आता ती वेळ समीपयेतेय जी कधीच येऊ नये असं सगळ्यांना वाटत होत पण तात्यांसमोर काळ हि हतबल झाला होता, त्याला त्यांनी स्वतः आव्हानदेऊन बोलावलं होत आणि आता तो दारात येऊन ठेपला होता पण तात्यांचं तेज एवढं कि तो अजूनही दाराच्या आत पाऊलठेवायला धजत नव्हता दार एकसारखे पाठी पुढे करून खर-खर वाजत तात्यांशी परवानगी मागत होते ,आम्हास ते फक्त जाणवतहोते पण तात्यास ते दिसत होते ,पण तात्या जाता जाता आपल्या सर्व कामाची, जीवनाची उजळणी करत बसले होते त्यांचाचेहरा स्वस्त आणि प्रसन्न दिसत होता फक्त हलत होत्या त्या पापण्या, प्रत्येक क्षण आठवताना होणारी पापण्यांची उघडझाप,त्यांच्या चेहऱ्याच्या आणि डोळ्याच्या बदलणाऱ्या भाव रचना, श्वासोच्छवास आणि हृदयाची होणारी धड धड वाटण्याऱ्यास तेसामान्य वाटेल पण आम्हास ते फक्त समजत होते त्यांच्या बरोबर आता आम्हीही ते क्षण जगायला लागलो होतो .
डोळ्यासमोर उभा होता एक चुणचुणीत , हुशार , तेजस्वी डोळे लाभलेला , डोक्यावर टोपी असणारा , अंगाने सडपातळ , पणजिभेत धार असणारा , शब्द शब्दातून अचूक वेध घेणारा , साक्षात सरस्वतीला जिभेवर नाचवणारा असा विनायक सावरकरांना आठवत होते, त्यांच्या एका डोळ्यातून अश्रूंचा थेंब घरघरळला,लहानपणीच १८९२ साली त्यांची आई त्यांना सोडूनगेली होती, आता त्यांना पाठीशी घालायला आईच नव्हती मायेचा हात फिरवणारी माउली हरवली होती ,आईची उणीव एकआईच भरून काढू शकत होती म्हणून ह्या पुढे माझी मातृभूमी हीच माझी आई आणि तीच माझ पदोपदी रक्षण करेल हि धारणा
लहानपण आठवताना डोळ्यांची हालचाल पापण्यातून स्पष्ट जाणवत होती त्यांच्या दुसऱ्या डोळ्यातून हि अश्रू आले होते कारण १८९९ सप्टें ५ मध्ये वडील हि त्यांना सोडून गेले.त्याच बरोबर घराची आर्थिक परिस्थिती खालावली त्यासाठी बाबारावांचे प्रयत्न सुरु होते पण खूप वेळा अपमान सहन करावा लागत होता त्यांचे तात्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून प्रयत्न सुरु होते तरीहीअशा परिस्थितीत देशसाठी कार्य सुरूच होते
त्यांना आठवत होते,
वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र,जयोस्तुते श्रीमहन्मंगले हे गीत, लोकमान्यांसमोर म्हंटलेले "हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा" हे गीत. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच तडफडून जाऊन, आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठीसशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी घेतलेली शपथ आठवत होती आणि तेथूनच सुरु झाला स्वातंत्र्य प्राप्तीचा अग्नीकुंड तद्नंतर डोळ्यासमोरून एक एक घटना जायला लागली
मार्च, १९०१ मध्ये यमुनाबाईशी झालेला विवाह,लग्नानंतर १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात घेतलेला प्रवेश व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला केलेले प्रयाण,स्थापलेली अभिनव भारत,"अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर"ह्या ग्रंथातून मांडलेला इतिहास त्यातूनच पेटवलेला यज्ञ त्या यज्ञात आहुती देण्यासाठी तत्पर असलेले योद्धे त्यांच्या आहुत्या मधून पुन्हा जन्मलेलेहजारो अंगारे
बाबारावांच्या अटके नंतर जेव्हा आपली आईस्वरूप वहिनी त्यांना पत्रातून प्रश्न विचारते
कशासाठी आम्हाला या घरात आणलंत या वंशात आणलंत, हे दुख, हे कष्ट, हि अहवेलना,माणसे, सावरकर कुटुंबाशी आपली ओळख आहे हा संशय येऊ नये या भीतीने आप्त ओळख देईनासे झाले आहेत
त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजेच सांत्वन पत्र
धन्य धन्य तो आमचा वंश, सुनिश्चय ईश्वर अंश, राम सेवा पुण्यलेष आमुच्या भाग्यी
अनेक फुले फुलती
फुलोनिया सुकोनी जाती
कोणी तयाची महती गणती
ठेविली असे
अमर होय ती वंशलता
निर्वंश जिचा देशाकरिता..
दिगंत पसरे सुगंधिता
मोक्षदायि पावन..
१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच झालेली अटक, जहाजातून १९१० जुलै ८ मार्सेलीस जवळ समुद्रात मारलेली उडी,१९१० डिसे.२४ जन्मठेप व
१९११ जाने.३१ झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षा,काळ्यापाणीची शिक्षा. तिथे काढलेले दिवस तुरुंगाच्या भिंतीवर लिहिलेले कमला हे महाकाव्य , भोगलेल्या यातना, "पुढे हिथे आमचे पुतळे उभे राहतील" जेलरला सांगितलेले आत्मविश्वास पूर्ण वाक्य.
अंदमानात असताना रवींद्रनाथ टागोरांना नोबेल मिळाला तात्यांना खूपच आनंद झाला त्यांनी त्यांना अभिनंदनाची तार पाठवली पण
मातृभूमीला स्वातंत्र्य करण्याचे धेय्य स्वीकारल्यामुळे आपल्याला मनापासून आवडणाऱ्या क्षेत्राकडे जाऊ शकलो नाही ह्याची चुणचुण मनात होती त्याच आशयाची तार त्यांनी लिहिली
"कवी कक्षपुर्ण हा माझा, (पण माझ्या मातृभूमीने मला सांगितलं), परी उणीव तेथे जा जा, "
क्रांतीचा बाष्पयंत्राचा कक्ष तो, (कवितेच्या रचनेच्या क्षेत्रात उणीव नाही), महाराष्ट्र कवी परंपरा खंड ना पडला तिला जरा, पण उणीव या देशाच्या मुक्ततते करता हुतात्म देणाऱ्या क्षेत्रात आहे, म्हणून मी तिकडे गेलो.
तिथे त्यांनी आपले लिहिलेले मृत्यूपत्र
हे मातृभूमि, तुजला मन वाहिलेलें
हे मातृभूमी, आतापर्यंत माझे मन, बुद्धी कविता, लेखन, वक्तृत्व हे सगळं फक्त तुझ्याच कारणी लावलं आहे, ह्या सगळ्यातुन फक्त तुझच वर्णन, तुझीच सेवा करत आलो आहे
तुझं कार्य म्हणजे सर्व देवतांना आवडणारं पवित्र कर्तव्य , आणि तीच इश्वरसेवा मानुन आजपर्यंत मी माझे प्रिय स्नेही, मित्रवर्ग तुलाच अर्पण केले, माझे स्वतःच्या तारुण्यसुलभ यौवनलीला स्वतःच्या हातानी जाळुन भस्म केल्या केवळ तुझ्यासाठीच
तुझ्याच पुजेमधे माझे घर, पैसा, संपती अर्पण केली, माझा लहान मुल, माझी पत्नी आणि वहीनी, तुझ्या सेवेच्या वणव्यातचढकलुन दिली. तुझ्या अग्नीमधे माझा अतीधैर्यवान मोठा भाउ आणि माझा लहान भाउ 'बाळ' ह्याचीही आहुती दिली. व आतामाझा देहही मी त्याच यज्ञामधे समर्पण करत आहे
पण ह्यात मोठे ते काय, आम्ही जरी सात भाउ जरी असतो, तरी आम्ही सर्व तुझ्याच सेवेत बलिदान करुन कृतार्थ झालो असतो.
काही क्षण चेहऱ्याची, डोळ्यांची काहीच हालचाल झाली नाही जाणवत होती ती फक्त ह्रदयाची धड धड थांबलेला प्रवास पुन्हा सुरू झाला.
नंतर रत्नागिरी मध्ये स्थानबद्धता, भाषा सुधार मोहीम ,विज्ञान निष्ठ लेख,समाजसुधारणा, भारताला मिळालेलं स्वातंत्र्य,झालेली फाळणी, या सुख दुखाच्या भावनेतून
घरावर उभारलेला भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज,
हिंदूची हिंदुत्वाची सांगितलेली व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू.
हिंदुत्वासाठी वाहिलेले जीवन,भारत भर दौरे, केलेली भाषणे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् याविषयी आणलेली आक्रमकता,जागृत करण्याची धडपड हिंदू महासभा,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,चीनशी पाकीस्थानशी युद्ध,हे सर्व आठवतांना पापण्यांची होणारी उघडझाप आम्ही बघत होतो.
हे सर्व आठवताना तात्यांचा चेहरा भावविशेष झालेला दिसत होता त्यांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यातून निघालेला तो क्षण होता
पण शेवटी त्यांचा प्रवास "आत्महत्या आणि आत्मार्पण" वर येऊन थांबला होता आणि त्यातून ते सर्वांना सांगत होते
"धत्योहं धत्योहं कर्तव्यं मे न विधते किंचित
धन्योहं धन्योहं प्राप्तव्यं सर्वमाद्य संपन्नम".
मी धन्य धन्य झालो आहे. माझे कोणतेही कर्तव्य करावयाचे उरलेले नाही आणि जे जे मिळवायचे ते सर्व मला प्राप्त झाले आहे.
तेवढ्यात तात्यांनी डोळे उघडले त्यांची नजर समोर असलेल्या शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांच्या तस्वीरींवर स्थिरावली त्यांना जणू पुन्हा हेच सांगायचा होत की मी जे काही जगलो,लिहील,सांगितलं ह्या सर्व बाबतीत जर माझी कोणी चूक काढू शकत असेल,जर माझे कान पकडण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो याच दोन महापुरुषांना आहे.
तात्यांचा हा प्रवास संपला होता आम्ही टिपायच तेवढ टिपलं होत. १९६६ फेब्रु १ तात्यांनी घोषणा करून प्रायोपवेशनास प्रारंभ केला आज त्याला २५ दिवस झाले होते
वार शनिवारी वेळ सकाळी १०-३० वाजता तात्यांनी शेवटचे डोळे मिटून आपला प्राण काळाला अर्पण केला.
काळ हि खाली मान घालून चालू लागला, न राहून आम्ही काळाला विचारलं आता तात्यांना कुठे नेणार
इहलोकी, परलोकी, की स्वर्गलोकी तो हि कृतज्ञतेने उत्तरला
जेथून आले तेथेच नेणार,सूर्यापासून एक तेज पृथ्वीवर आल होत आता ते पुन्हा सूर्यालाच जाऊन मिळणार
आणि जेव्हा जेव्हा अंधार होईल तेव्हा तेव्हा हेच तेज पृथ्वीवर पुन्हा अवतरणार,आम्हाला काही क्षणापुरता भासच झाला जणू काही तात्याच त्याच्या तोंडून बोलत होते
अनादी मी, अनंत मी अवध्य मी
१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार....
जन्मापासून मृत्यूपर्यंत मातृभूमीसाठी आयुष्य अर्पण केलेल्या,
हिंदुत्वाचे स्फुल्लिंग कणा कणात,रगा रगात चेतावणाऱ्या
!!! "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" या तेजोमय सूर्यास आम्हा सर्वांचा सलाम ! सलाम !! आणि सलाम !!!